
कोरोना म्हणजे सरकारने उठवलेले थोतांड आहे. कोरोनामुळे सध्या मंदिरे बंद असून देवांना कुलूपबंद करून ठेवण्यात आले आहे. माझे केवळ महाराष्ट्रातल्या नव्हे, तर देशातल्या सबंध देवभक्तांना आवाहन आहे की, खरंच देवभक्त असाल तर मंदिरांची कुलपे तोडून आत जाऊयात, असे वक्तव्य शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे यांनी केले आहे. त्यांच्या या विधानामुळे पुन्हा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.
ते सांगलीमध्ये पत्रकारांशी बोलत होते. ते म्हणाले, सरकार कोरोनाचा थोतांडपणा वाढवत आहे. लॉकडाऊन लावल्यामुळेच अधिक नुकसान होत आहे. सगळे मोकळे करू देत. काहीही देशात वाटोळे होणार नाही. कोरोनाच्या लॉकडाऊनमुळे जेवढे नुकसान झालेय त्याच्या एक अब्जांशदेखील वाटोळे होणार नाही. सरकार लॉकडाऊन लावतंय ते शंभर टक्के चूकच आहे.































































