
कोरोनाचे रूग्ण बरे होण्याची संख्या दिवसागणीक वाढत आहे. राज्यात बरे झालेल्या एकूण रुग्णांच्या निम्मे रुग्ण या एका आठवड्यात बरे झाले आहेत. आतापर्यंत सर्वाधिक 600 हून अधिक रुग्णांना रविवारी घरी सोडण्यात आले असून एकूण बरे झालेल्या रुग्णांची संख्या सुमारे 7,688 एवढी झाली आहे. विशेष म्हणजे बरे होणारे सर्वाधिक रुग्ण हे मुंबई, पुणे, नाशिक, मालेगाव या भागातील आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.
केंद्र शासनाने सुमारे एक आठवड्यापूर्वी कोरोना रुग्णांना डिस्चार्ज देण्याबाबत सुधारीत धोरण जाहीर केले होते. त्यानुसार कुठलीही लक्षणे नसलेल्या रुग्णांना 14 दिवसांऐवजी 10 व्या दिवशी घरी सोडण्यात येत आहे. यामुळे बरे झालेल्या रूग्णांची संख्याही वाढली आहे. गेल्या रविवारी 10 मे रोजी 399 रुग्णांना घरी सोडण्यात आले होते. त्यानंतर 11 मे रोजी 587, 12 मे रोजी 339, 13 मे रोजी 422, 14 मे रोजी 512, 15 मे रोजी 505, 16 मे रोजी 524 आणि रविवारी 600 हून अधिक रुग्णांना घरी सोडण्यात आले आहे. अशा प्रकारे या एका आठवड्यामध्ये 3700 रुग्णांना घरी सोडण्यात आले आहे. राज्यात आतापर्यंत 7688 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. त्यातील 50 टक्के रूग्ण हे 10 ते 17 मे या कालावधीतील आहेत. साधारणत: मार्चच्या शेवटच्या आठवड्यापासून बरे झालेल्या कोरोनाबाधीत रुग्णांना घरी सोडले जात आहे. मार्चमध्ये दोन अंकी असलेली ही संख्या एप्रिलच्या दुसऱ्या आठवड्यापासून तीन अंकी झाली आहे.
बरे झालेल्या रुग्णांची संख्य़ा
दिनांक घरी पाठवलेले रुग्ण
- २७ मार्च २४
- २८ मार्च २६
- २९ मार्च ३५
- ३० मार्च ३९
- ३ एप्रिल ५०
- ४ एप्रिल ५२
- ५ एप्रिल ५६
- ६ एप्रिल ६६
- ७ एप्रिल ७९
- ८ एप्रिल ११७
- ९ एप्रिल १२५
- १० एप्रिल १८८
- ११ एप्रिल २०८
- १२ एप्रिल २१७
- १३ एप्रिल २२९
- १४ एप्रिल २५९
- १५ एप्रिल ३६
- १६ एप्रिल ५
- १७ एप्रिल ३१
- १८ एप्रिल ३४
- १९ एप्रिल १४२
- २० एप्रिल ६५
- २१ एप्रिल १५०
- २२ एप्रिल ६७
- २३ एप्रिल ५१
- २४ एप्रिल ११७
- २५ एप्रिल ११९
- २६ एप्रिल ११२
- २७ एप्रिल ९४
- २८ एप्रिल १०६
- २९ एप्रिल २०५
- ३० एप्रिल १८०
- १ मे १०६
- २ मे १२१
- ३ मे ११५
- ४ मे ३५०
- ५ मे ३५४
- ६ मे २७५
- ७ मे २०७
- ८ मे १६९
- ९ मे ३३०

























































