कोरोनाने मारले, पालिकेने तारले 200 कोरोना योद्धय़ांच्या कुटुंबीयांना 50 लाखांची मदत, 160 जणांना नोकरी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पालिकेच्या कोरोना लढय़ात मुंबईकरांचा जीव वाचवण्यासाठी अहोरात्र काम करताना स्वतःचा जीव गमावलेल्या 200 कर्मचाऱयांच्या कुटुंबीयांच्या पालिकेने 50 लाखांची मदत केली आहे. तर 160 जणांना पालिकेच्या सेवेत नोकरीही दिली आहे. पालिकेच्या कोरोना लढय़ात आतापर्यंत 270 कर्मचाऱयांचा मृत्यू झाला आहे. 

मुंबईत मार्च 2020मध्ये कोरोनाने शिरकाव केल्यानंतर आतापर्यंत कोरोनाच्या तीन लाटा आल्या. पालिका आणि राज्य सरकारने केलेल्या यशस्वी नियोजनामुळे मुंबईसारख्या दाटीवाटीच्या शहरात तीन लाटा यशस्वीरीत्या परतवून लावण्यात यश आले. मात्र कोरोनाच्या सुरुवातीच्या काळात मोठय़ा संख्येने होणारी रुग्णवाढ आणि मृत्यू यामुळे दहशत निर्माण झाली होती. यामुळे पालिकेने आपली संपूर्ण यंत्रणा कोरोना लढय़ात उतरवली. पालिकेचे सुमारे 1 लाख 10 हजार नियमित कर्मचारी तर 25 ते 30 हजार कंत्राटी कर्मचारी अहोरात्र कोरोना लढय़ात आपले योगदान देत होते. मात्र यामध्ये अनेक कर्मचाऱयांचा मृत्यू झाला. यामध्ये मृत्यू झालेल्या एकूण 270 कर्मचाऱयांपैकी 177 मृत कर्मचाऱयांच्या कुटुंबीयांना पालिकेने 50  लाखांची आर्थिक मदत केली, तर 23 जणांना पेंद्र सरकारच्या माध्यमातून 50 लाखांची मदत करण्यात आली. ज्या मृत कर्मचाऱयांचे वारस लहान आहेत, 18 वर्षे पूर्ण झाली नाहीत अशा सर्वांना वयाची 18 वर्षे पूर्ण झाल्यानंतर नोकरी देण्यात येईल. कुटुंबातील एकाला पालिकेची नोकरी उपक्रमात मुलगा, मुलगी किंवा विवाहित मुलगी असली तरी लाभ देण्यात येत आहे. 

ऑक्टोबरपर्यंत योजना सुरू राहणार 

  • केंद्र आणि राज्य सरकारच्या घोषणेनुसार कोरोना लढय़ात काम करताना कोविडची लागण होऊन जीव गमावलेल्यांच्या कुटुंबाला 50 लाखांची मदत आणि कुटुंबातील एकाला नोकरीत सामावून घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सद्यस्थितीत कोरोना पूर्ण आटोक्यात असला तरी ऑक्टोबर 2022 पर्यंत ही योजना सुरू राहणार आहे. 
  • दरम्यान, कोविड काम करताना कोरोनाची लागण होऊन मृत्यू झालेल्या सर्व कोरोना योद्धय़ांच्या कुटुंबीयांना 50 लाखांची आर्थिक मदत आणि कुटुंबातील एका वारसाला पालिकेच्या सेवेत नोकरी देण्यात येणार आहे. त्यामुळे शिल्लक प्रकरणांबाबत कार्यवाही सुरू असल्याचेही पालिका प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले.