
कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी केंद्र सरकारकडून चौथ्या लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली आहे. मात्र कोरोनाचा फैलाव अजूनही सुरू आहे. देशात गेल्या 24 तासात 5,611 रुग्णांची नोंद करण्यात आली. 24 तासांत एवढे रुग्ण आढळण्याची ही पहिलीच वेळ आहे. लॉकडाऊन वाढवण्यात आल्यानंतर देखीलवाढती रुग्ण संख्या ही चिंतेची बाब आहे. मात्र त्याच वेळी रुग्णांचे बरे होण्याचे प्रमाण देखील चांगले आहे.
देशातील बाधितांचा आकडा 1,06,750 वर पोहोचला असून, 61,146 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तर 3,303 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. दिलासादायक बाब म्हणजे आतापर्यंत 42,298 रुग्ण ठणठणीत बरे झाले आहेत.



























































