कोरोनाबाधितांचे प्रमाण पाच टक्क्यांवर गेले तर त्या जिल्ह्यात निर्बंध लावणार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

जगभरात वेगाने पसरत असलेल्या ओमायक्रोनचा धोका देशात वाढू नये यासाठी आवश्यक ती काळजी घेण्यात येत आहे. ज्या जिल्ह्यांत कोरोना पॉझिटिव्हीटी रेट 5 टक्क्यांपर्यंत पोहोचेल त्याठिकाणी निर्बंध लावण्यात येतील, असा इशारा आयसीएमआरचे प्रमुख बलराम भार्गव यांनी आज दिला.

हिंदुस्थानात मास्क वापराकडे दुर्लक्ष

सद्यपरिस्थितीत लस आणि मास्क या दोन्ही बाबी महत्त्वाच्या आहेत. हे आपण जागतिक परिस्थितीपासून शिकायला हवे, असे सांगत नीती आयोगाचे सदस्य क्ही.के. पॉल यांनी हिंदुस्थानात मास्क वापराकडे दुर्लक्ष होत असल्याबद्दल चिंता व्यक्त केली.