धाराशिव जिल्ह्यात कोरोनाचा तिसरा बळी; कोरोनाबाधितांची संख्या 73 वर

287

धाराशिव जिह्यात कोरोनाचा तिसरा बळी गेला आहे. येथील जिल्हा शासकीय रुग्णालयात कळंब तालुक्यातील शिराढोण येथील 64 वर्षीय महिलेचा सोमवारी सकाळी कोरोनामुळे मृत्यू झाला. जिह्यात कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. दोन जणांचा अहवाल रविवारी कोरोना पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे जिह्यातील कोरोनाबाधित रुग्णाची संख्या 73 झाली आहे.

जिह्यातील 90 जणांचे स्वॅब तपासणीसाठी लातूर येथील विलासराव देशमुख वैद्यकीय विज्ञान संस्थेत तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. त्यापैकी 75 व्यक्तींचे अहवाल कोरोना निगेटीव्ह आले असून 2 व्यक्तींचे अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. तर तीन व्यक्तींच्या अहवालाचा निष्कर्ष आलेला नाही. आणखी 10 अहवाल प्रलंबित असून, त्यांचे अहवाल सोमवारी मिळण्याची शक्यता आहे. जिल्हाधिकारी दिपा मुधोळ- मुंडे, उपविभागीय अधिकारी आहिल्या गाठाळ, तहसिलदार मंजूषा लटपटे, तालुका अधिकारी जाधव यांनी शिराढोण येथे भेट देत कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी करण्यात येणाऱ्या विविध उपाययोजनांचा आढावा घेतला.

आपली प्रतिक्रिया द्या