
निर्बंध शिथील केल्यानंतर बीडमध्ये रविवारी कोरोनाबाधितांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. बहुतांश रूग्ण हे ग्रामीण भागातील आहेत. बीड जिल्ह्यामध्ये रविवारी 159 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. तर 138 जणांना डिस्चार्ज देण्यात आला. तसेच 6 जणांचा मृत्यू झाला आहे.
बीड जिल्ह्यामध्ये कोरोनाबाधित आढळणाऱ्यांची संख्या 159 च्या पुढे गेला आहे. जिल्ह्यात 159 जणांना लागण झालेली आहे.तर 3870 जणांच्या तपासणीचा अहवाल आला आहे. कोरोनाबाधितांमध्ये अंबाजोगाई 2, आष्टी 24, बीड 28, धारूर 21, गेवराई 14, केज 7, माजलगाव 4, परळी 2, पाटोदा 41, शिरूर 8, वडवणी 8 अशी कोरोनाबाधितांची संख्या आहे. दिवसभरात 138 जणांना डिस्चार्ज देण्यात आला तर 6 जणांचा मृत्यू झाला आहे.


























































