दिलासादायक! राज्यातील कोरोना रुग्णांच्या संख्येत लक्षणीय घट

राज्यात कोरोनाबाधित मृतांच्या संख्येत मोठी घट झाली आहे. काल 58 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला होता. आज 36 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच दैनंदिन रुग्णसंख्येतही घट झाली आहे. शिवाय कालच्या तुलनेत एकूण सक्रिय रुग्णांची संख्याही घटल्याने राज्यातील आजची कोरोना स्थिती दिलासादायक आहे.

राज्याच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार आज दिवसभरात राज्यात 3 हजार 206 इतक्या नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. काल ही संख्या 3 हजार 276 इतकी होती. तर आज दिवसभरात एकूण 3 हजार 292 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. काल ही संख्या 3 हजार 723 इतकी होती. तर आज 36 रुग्णांचा मृत्यू झाला. काल ही संख्या 58 इतकी होती. आज राज्यात झालेल्या 36 रुग्णांच्या मृत्यूनंतर राज्याचा मृत्युदर 2.12 टक्क्यांवरच स्थिर आहे. याबरोबरच राज्यात एकूण 63 लाख 64 हजार 27 रुग्ण बरे झाले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 97.24 टक्के इतके झाले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या