कोरोना काळात रुग्णांची मदत करणाऱ्या रिक्षाचालकाला बलात्कार प्रकरणी अटक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कोरोना काळात रुग्णांची मदत करणाऱ्या रिक्षा चालकाला बलात्काराच्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे. ही घटना मध्य प्रदेशमधील आहे. या रिक्षाचालकाचं नाव जावेद असं आहे.

2021मध्ये आलेल्या कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत जावेद याने रिक्षाला ऑक्सिजन सिलिंडर लावून अनेक रुग्णांना मदत केली होती. आजतकने दिलेल्या वृत्तानुसार, जावेद याच्या घरी एक जोडपं राहतं. या जोडप्यातील महिलेने जावेदवर बलात्काराचा आरोप केला आहे.

महिलेने केलेल्या आरोपांनुसार, जावेद ती घरी एकटी असताना तिच्यासोबत छेडछाड करायचा. एकदा त्याने तिच्यावर बलात्कार केला. पीडितेने नवऱ्याला याची कल्पना दिल्यानंतर त्याचा जावेदसोबत वाद झाला.

त्यानंतर हे जोडपं वेगळ्या जागी राहू लागलं. जावेदने तिथेही तिचा पाठलाग केला आणि तिला त्रास देऊ लागला. त्याने तिला बदनाम करण्याची धमकी दिली. त्यानंतर महिलेने पोलिसात तक्रार केली. पोलिसांनी जावेदला अटक केली असून त्याच्यावर बलात्काराचा आरोप दाखल करण्यात आला आहे.