
अकोला जिल्ह्यात शनिवारी सायंकाळी 5 वाजेपर्यंत एकूण 24 अहवाल मिळाले. ते सर्व अहवाल निगेटिव्ह आले आहेत, असे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या सूत्रांनी स्पष्ट केले आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून मिळालेल्या माहितीनुसार आतापर्यंत एकूण 537 नमुने पाठविण्यात आले आहेत. त्यापैकी 524 अहवाल आले आहेत. एकूण 508 अहवाल निगेटिव्ह आले आहेत. तर अद्याप 13 अहवाल प्रलंबित आहेत.
आतापर्यंत एकूण 537 जणांचे नमुने पाठवण्यात आले आहेत. त्यात प्राथमिक तपासणीचे 419, फेरतपासणीचे 81 तर वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे 37 नमुने होते. आजपर्यंत एकूण 524 अहवाल मिळाले आहेत. त्यात प्राथमिक तपासणीचे 407 तर फेरतपासणीचे 80 व वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे 37 अहवाल आहेत. एकूण निगेटिव्ह अहवालांची संख्या 508 आहे. शनिवारी आलेल्या 24 अहवालात सर्व अहवाल निगेटिव्ह आले आहेत. जिल्ह्यात एकूण 16 कोरोनाबाधित रुग्ण होते. त्यातील दोघांचा मृत्यू झाला. 23 एप्रिलला सात जणांना घरी सोडण्यात आले. त्यामुळे आता सात रुग्ण उपचार घेत आहेत, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील सूत्रांनी दिली आहे.
आजअखेर जिल्ह्यात 13 अहवाल प्रलंबित आहेत. त्यात 12 प्राथमिक तर एक फेरतपासणीचा आहे. जिल्ह्यात आजअखेर बाहेरुन आलेल्या 547 प्रवाशांपैकी 236 जण गृह अलगीकरणात तर 78 जण संस्थागत अलगीकरणात असे एकूण 314 जण अलगीकरणात आहेत. 212 जणांची अलगीकरणाची 14 दिवसांची मुदत पूर्ण झाली आहे. आज तीन जण नव्याने दाखल झाले, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून मिळाली आहे.





























































