
अमरावतीमध्ये गेल्या 24 तासात 498 नव्या रुग्णांची नोंद झाली असून यामध्ये सात रुग्णांचा मृत्यू देखील झाला आहे. त्यामुळे जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी शहर व जिल्ह्यात कोरोना प्रतिबंधात्मक उपायोजनासाठी करण्यात येणार निर्बंध कडक करण्यात आले आहेत. ही परिस्थिती कायम राहिल्यास लॉकडाऊनचे संकेत जिल्हाधिकाऱ्यांकडून देण्यात आले आहेत.
अमरावती जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. अमरावतीमध्ये गेल्या 24 तासात 498 नव्या रुग्णांची नोंद झाली असून यामध्ये सात रुग्णांचा मृत्यू देखील झाला आहे. त्यामुळे जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी शहर व जिल्ह्यात कोरोना प्रतिबंधात्मक उपायोजनासाठी करण्यात येणार असून कडक निर्बंध करण्यात आले आहेत अशी माहिती दिली. तसेच राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही अमरावीतीचा आढावा घेऊन या ठिकाणी संचारबंदीसह निर्बंध अधिक कडक करण्याचा विचार असल्याचे स्पष्ट केले आहे.

































































