
देशात एकीकडे कोरोना संसर्गाने थैमान घातले असून रुग्णसंख्या झपाटय़ाने वाढत आहे तर दुसरीकडे हरिद्वारमध्ये आयोजित महाकुंभमेळ्यात दुसऱया शाहीस्नानासाठी उसळेल्या भाविकांच्या गर्दीमुळे कोरोना नियमांच्या फज्जा उडाला. शाहीस्नानात सहभागी झालेले काही साधू कोरोना पॉझिटिव्ह आढळल्याने टेंशन वाढले आहे.
हरिद्वारमध्ये आयोजित कुंभमेळ्यादरम्यान दुसरे शाहीस्नान सोमवारी पार पडले. या शाहीस्नानात सहभागी झालेले वेगवेगळ्या आखाडय़ांतील साधू-संत आणि भाविक सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचे उल्लंघन करत मास्कशिवाय पाण्यात उतरले. हजारोंच्या संख्येने लोक एकाचवेळी गर्दी करत पाण्यात उतरत असल्याने पोलीस अधिकारीही हतबल झाले.
कुंभमेळ्याचे महानिरीक्षक संजय गुंज्याल यांनी एवढय़ा गर्दीत सोशल डिस्टन्सिंगचं पालन करवून घेणे शक्य नाही, सक्ती करण्याचा प्रयत्न केला तर चेंगराचेंगरीसारखी परिस्थिती उद्भवू शकते, अशी अडचणही त्यांनी व्यक्त केलीय.
2056 ऑक्टिव्ह रुग्ण
शाहीस्नानाच्या एक दिवस आधीच उत्तराखंडमधून कोरोना रुग्णांचे भीतिदायक आकडे समोर आले आहेत. हरिद्वारमध्ये गेल्या 24 तासांत 386 नवे रुग्ण आढळून आले असून शहरातील ऑक्टिव्ह रुग्णसंख्या 2056 वर पोहचली आहे. 8 जणांचा मृत्यू झाला आहे. तर डेहराडूनमध्ये 582, नैनिताल येथे 122 नवे कोरोना रुग्ण समोर आले आहेत. तर हर की पौडी येथे रविवारी 9 जणांना कोरोनाची लागण झाली आहे.
उत्तराखंडच्या पवित्रभूमी हरिद्वार येथील पुंभमेळय़ात सोमवारी दुसरे शाही स्नान पार पडले. एकीकडे कोरोना संसर्गाने संपूर्ण देशाची धाकधूक वाढवली असताना या शाही स्नानाची पवित्र पर्वणी साधण्यासाठी अनेक आखाडय़ांतील साधूसंत, लाखो भाविकांची गर्दी उसळली होती.





























































