मालवणात 183 शिक्षकांची कोरोना चाचणी होणार; शाळा सुरू करण्याचे नियोजन

कोरोना महामारीमुळे 10 महिने शाळा बंद आहेत. आता कोरोनाचा प्रादुर्भाव ओसरत असल्याने पाचवी ते आठवीचे वर्ग सुरू करण्याबाबत शासन आदेश आले आहेत. येत्या 27 जानेवारीपासून शाळा सुरू करण्याबाबत नियोजन सुरू आहे. त्यासाठी सुरक्षिततेचा उपाय म्हणून मालवण तालुक्यात 96 शाळांमधील 183 शिक्षकांच्या कोरोना आरटीपीसीआर टेस्ट केल्या जाणार आहेत, अशी माहिती गटशिक्षणाधिकारी संजय माने यांनी दिली.

शाळा सुरू होत असल्या तरी मास्क, सॅनिटायझर, सोशल डिस्टन्स या कोरोना खबरदारी नियमांचे पालन बंधनकारक करून शाळा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यात शिक्षकांसाठी कोरोना आरटीपीसीआर टेस्ट बंधनकारक करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर मालवण तालुक्यातील 183 शिक्षक व केंद्रप्रमुख यांच्या टेस्ट तीन दिवसात केल्या जाणार आहेत. गुरुवारी 61 शिक्षकांचे स्वॅब नमुने मालवण ग्रामीण रुग्णालयाच्या वतीने घेण्यात आले. आगामी दोन दिवसात राहिलेल्या सर्व शिक्षकांची टेस्ट होणार आहे.

आपली प्रतिक्रिया द्या