
परभणी जिल्ह्यातील कोरोना पॉझिटिव्ह एका रुग्णांची प्रकृती स्थिर असून या रुग्णाचा पहिला स्वॅब अहवाल निगेटिव्ह आला आहे. या रुग्णाचा दुसरा स्वॅब घेण्यात आला असून तो संभाजीनगरमधील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात तपासणीसाठी पाठविण्यात आला आहे, अशी माहिती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली आहे. या रुग्णाचा दुसरा अहवालही निगेटिव्ह आल्यास तो रुग्ण कोरोनामुक्त होणार असल्याने या अहवालाची प्रतीक्षा आहे. परभणी येथील जिल्हा रुग्णालयात याआधीचे 645 आणि रविवारी 16 अशा एकूण 661 रुग्णांची तपासणीसाठी नोंद झाली आहे.

































































