राज्यात कोरोना चाचणीच्या दरात मोठी कपात, चाचणी झाली स्वस्त

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

राज्यात कोरोना चाचणीच्या दरात मोठी कपात करण्यात आली आहे. शासनाने घेतलेल्या निर्णयानुसार कोरोना चाचणी आता 600 ते 800 रुपयांनी स्वस्त झाली आहे.

पूर्वी कोरोना चाचणीसाठी रुग्णांना जास्तीत जास्त 2800 रुपये मोजावे लागत होते. आता रुग्णांना जास्तीत जास्त 2 हजार रुपये लागणार आहेत. कोरोना चाचणीसाठी खासगी लॅबमध्ये गेल्यास 1200 रुपये मोजावे लागणार आहेत. पूर्वी हे शुल्क 1900 रुपये इतके होते. कोविड सेंटर, क्वारंटाईन सेंटर, हॉस्पिटलमध्ये पूर्वी 2200 रुपये लागात होते आता ते कमी करून 1600 रुपये करण्यात आले आहे. तसेच घरून स्वॅब घेऊन चाचणी केल्यास पूर्वी अडीच हजार लागत होते आता 2 हजार रुपयात ही सेवा नागरिकांना मिळणार आहे.

गेल्या आठवड्यात आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दर कमी करण्याचे संकेत दिले होते. त्यासाठी भारतीय आर्युविज्ञान संस्थेशी चर्चाही सुरू होती. आता शासनाने निर्णय घेऊन कोरोना चाचणीचे दर कमी केले आहेत. त्यामुळे नागरिकांना दिलासा मिळणार आहे.