मोदींचा इशारा; कोरोनाचा विषाणू रूप बदलून येणार, तिसऱया लाटेशी लढणार 1 लाख योद्धे

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कोरोनाच्या दुसऱया लाटेत विषाणूच्या वेळोवेळी बदलणाऱया रूपांमुळे उभी राहिलेली आव्हाने पाहिली आहेत. हा विषाणू अजूनही आपल्यामध्ये आहे व त्याच्या म्युटेड होण्याचीही शक्यता आहे. त्यामुळे आपल्याला प्रत्येक प्रकारची सावधगिरी बाळगूनच आगामी आव्हानांना सामोरे जायला हवे, तशी तयारी केली पाहिजे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सांगितले.

संपूर्ण देशाची धडधड वाढवणाऱया कोरोनाच्या तिसऱया लाटेशी 1 लाख फ्रंटलाईन वर्कर्स लढा देणार आहेत. या योद्धय़ांना 26 राज्यांतील 111 प्रशिक्षण केंद्रांवर पुढील दोन-तीन महिन्यांत विशेष प्रशिक्षण देऊन तयार केले जाणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी या महाभियानाचा शुभारंभ केला.

योद्धय़ांना कौशल्याचे धडे; 6 टास्कसंबंधी प्रशिक्षण

देशभरातील 1 लाखांहून अधिक कोरोना योद्धय़ांना काwशल्याचे धडे व नवीन काही शिकवणे हा ‘व्रॅश कोर्स’ या विशेष प्रशिक्षण अभियानाचा प्रमुख हेतू आहे. याअंतर्गत होम केअर सपोर्ट, बेसिक केअर सपोर्ट, अॅडव्हान्स केअर सपोर्ट, इमर्जन्सी केअर सपोर्ट, सॅम्पल कलेक्शन सपोर्ट आणि मेडिकल इक्विपमेंट सपोर्ट यांसारख्या 6 टास्कसंबंधी प्रशिक्षण दिले जाणार आहे. देशातील आघाडीच्या तज्ञांनी ’व्रॅश कोर्स’ तयार केला आहे.