कोल्हापुरात आज आणखी 31 कोरोनाबाधीत सापडले; एकूण 372

664

कोल्हापूर जिल्ह्यात आज आणखी 31 कोरोनाबाधीत रुग्ण आढळले आहेत. हजारो अहवाल प्रतिक्षेत असल्याने, सायंकाळी कोरोना बाधितांची संख्या चारशेचा टप्पा गाठण्याची शक्यता आहे. आतापर्यंत जिल्ह्यात बाधितांचा आकडा 372 वर पोहोचला आहे.

भुदरगड तालुक्‍यात आज 12 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. तर शाहुवाडी तालुक्यात काल रात्रीच ही संख्या शंभरी पार गेली आहे. आज अखेर भुदरगड तालुक्यात 47 रुग्णांची नोंद झाली आहे. लहान बारवे, पळशिवणे, नवले, गिरगाव, देऊळवाडी, वाघापूर या गावात प्रत्येकी एक तर अंतुर्लीत तीन, सुक्याचीवाडी, शिवडाव मध्ये दोन रूग्ण आढळले आहेत. या सर्व गावात प्रांताधिकारी संपत खिलारी यांनी कटेन्मेंट झोन जाहीर केला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या