
कोरोनाच्या विळख्यातून सुटण्याचा प्रयत्न गेली दोन वर्षंहून अधिक काळ सुरू आहे. काही देशांना त्यात यश आलं असून काही देश त्याचा अजूनही सामना करत आहेत. त्यामुळे काही ठराविक काळाच्या अंतराने हे देश कोरोना रुग्णांची अद्ययावत माहिती देत असतात. अशाच एका देशातील रुग्णसंख्या शेअर करण्याच्या नादात भलतीच गडबड झाली आहे.
कॅनडाच्या आरोग्य विभागाने हा घोळ घालून ठेवला आहे. कोरोना रुग्णांची माहिती शेअर करण्याच्या नादात त्यांनी पॉर्न व्हिडीओची लिंक ट्विटरवर शेअर केली आहे. कॅनडाच्या क्युबेक आरोग्य मंत्रालयाच्या ट्विटर हँडलवर चुकून पॉर्न व्हिडीओची लिंक शेअर झाली आहे.

हे ट्वीट जवळपास 30 मिनिटे तसंच राहिलं. त्यानंतर नेटकऱ्यांनी केलेल्या ट्रोलिंगमुळे ही चूक लक्षात आली. मग ते ट्वीट डीलिट करण्यात आलं. त्यानंतर क्युबेक आरोग्य मंत्रालयाने माफीही मागितली. मात्र, तोवर फोटो व्हायरल झाले होते.
आरोग्य मंत्रालयाने ट्वीट करून म्हटलं की, ही स्थिती आमच्या नियंत्रणाबाहेरची होती, त्यामुळे आमच्या ट्विटरवर चुकून काही अनुचित आशय शेअर झाला. त्यामागच्या कारणांचा आम्ही शोध घेत आहोत, तुम्हाला झालेल्या त्रासाबद्दल आम्ही दिलगिरी व्यक्त करत आहोत, असं त्यांनी पोस्ट केलं आहे.





























































