
शहरात आज सकाळी आणखी 24 नवे कोरोना बाधित रुग्ण आढळले. त्यामुळे आज सकाळी शहरातील कोरोना बाधितांची संख्या 651 वर पोहोचल्याची माहिती जिल्हा रुग्णालयाच्या सूत्रांनी दिली.
आज सकाळी आढळून आलेल्या बाधितांमध्ये संभाजीनगर 3, पुंडलिकनगर गल्ली क्र. 2 भागातील 2, सिडको एन 8 भागातील 1, सिडको एन -7 भागातील 4, रामनगर मधिल 1, प्रकाश नगर मधील 1, संजय नगर मुकुंदवाडी भागातील 5, मनपा कर्मचारी 1, चिकलठाणा येथील 1, भडकल गेट भागातील 1, दत्तनगर भागातील 1, शहानुर मिया दर्गा भागातील 1, गांधीनगर परिसरातील 1 आणि रोशन गेट भागातील 1 जण अशा 24 जणांचा समावेश आहे.



























































