महाराष्ट्रात अडीच कोटी नागरिकांचे लसीकरण

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

लसीकरणात कायम आघाडीवर असलेल्या महाराष्ट्राने आता राज्यातील अडीच कोटींहून अधिक नागरिकांना लसीकरण करण्याचा टप्पा गाठला आहे. देशातील अग्रस्थान कायम ठेवताना एवढय़ा मोठय़ा प्रमाणात लसीकरण करणारे महाराष्ट्र एकमेव राज्य असून त्यापाठोपाठ उत्तर प्रदेश आणि गुजरातचा क्रमांक लागतो. राज्याच्या या कामगिरीबद्दल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी यंत्रणेचे काैतुक केले आहे.

उत्तर प्रदेशात 2 कोटी 15 लाख 65 हजार नागरिकांना लस देण्यात आली असून गुजरातमध्ये 1 कोटी 91 लाख 88 हजार नागरिकांचे तर राजस्थानमध्ये 1 कोटी 84 लाख 76 हजार नागरिकांचे लसीकरण झाले.

50 लाखांहून अधिक जणांनी घेतले दोन्ही डोस

राज्यात दोन्ही डोस घेतलेल्या नागरिकांची संख्या 50 लाखांहून अधिक आहे. आजपर्यंत महाराष्ट्रात 2 कोटी 7 हजार 70 नागरिकांना लसीचा पहिला डोस देण्यात आला आहे. तर दुसरा डोस घेतलेल्या नागरिकांची संख्या सुमारे 50 लाख 8 हजार 476 एवढी आहे.