देशातील कोरोनाग्रस्तांच्या आकड्यात आतापर्यंतची सर्वात मोठी वाढ, वाचा धक्कादायक आकडेवारी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
फोटो- प्रातिनिधीक

देशातील कोरोनाग्रस्तांच्या आकड्यात गेल्या 24 तासात तब्बल 38902 ने वाढ झाली आहे. ही आतापर्यतंची सर्वात मोठी रुग्णवाढ आहे. गेल्या 24 तासात देशात 543 जणांचा मृत्यूही झाला आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जाहीर केलेली ही आकडेवारी धक्कादायक आहे.

देशात सध्या 10,77,618 रुग्ण असून त्यातील 3,73,379 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. तर 677423 रुग्ण बरे झाले आहेत. तर आतापर्यंत देशात 26,816 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.