धक्कादायक! हवेतून पसरू शकतो कोरोना; गर्दीची बंदिस्त ठिकाणेही टाळा

1527

हवेतून कोरोना विषाणूचा संसर्ग होऊ शकतो हे आता जागतिक आरोग्य संघटनेने (डब्ल्यूएचओ) मान्य केले आहे. लोकांनी बंदीस्त गर्दीच्या ठिकाणीही जाणे टाळले पाहिजे. तेथेही संसर्ग पसरू शकतो असे सांगतानाच डब्ल्यूएचओने नवीन मार्गदर्शक तत्वे (गाईडलाइन्स) जारी केल्या आहेत.

दोन व्यक्तींमधील संपर्कातून नाका-तोंडातून पडणाऱया ड्रॉप्लेटमधून कोरोना विषाणूचा संसर्ग होतो असे आजवरचे संशोधन आहे. मात्र, तीन दिवसांपूर्वी हवेतून कोरोनाची बाधा होऊ शकते अशी भिती 32 देशांमधील 269 शास्त्र्ाज्ञांनी व्यक्त केली होती. जागतिक आरोग्य संघटनेने सुरूवातीला मान्य केले नव्हते पण आता यावर शिक्कामोर्तब केल्यामुळे जगभरात चिंता वाढली आहे. कोरोना संसर्गाचा अनेक उद्रेक होईल अशी भिती व्यक्त होत आहे.

काय आहेत गाईडलाइन्स?
– गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळले पाहिजे. बंदिस्त जागी गर्दी होत असेल तर हवेद्वारे ड्रॉप्लेट्सच्या माध्यमातून कोरोनाचा प्रसार होऊ शकतो.
– रेस्टॉरंट्स, फिटनेस सेंटर्स येथे कोरोनाचा संसर्ग झाल्याचे दिसून आले आहे.
– बंदिस्त जागी हवा खेळती ठेवली पाहिजे.
– बंदिस्त जागी गर्दीच्या ठिकाणी जर हवा खेळती नसेल आणि कोरोनाबाधित व्यक्तीचा तेथे वावर असेल तर त्याच्या ड्रॉप्लेट्सच्या माध्यमातून इतरांना संसर्ग होऊ शकतो.

आपली प्रतिक्रिया द्या