कोरोनामुक्त रुग्णांमध्ये गुलियन बॅरी सिंड्रोमचा धोका!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कोरोनातून बरे झालेल्या रुग्णांमध्ये सध्या गुलियन बॅरी सिंड्रोम (जीबीएस) हा श्वसनाशी संबंधित दुर्मिळ आजार आढळून येत आहे. मुंबईतील एका 37 वर्षीय कोरोना पॉझिटिव्ह महिलेवर मुंबई सेंट्रलच्या वोक्हार्ट रुग्णालयात या आजारावर यशस्वीरित्या उपचार करण्यात आले आहेत.

ज्योस्त्ना मारू हिला कोरोनामुक्त झाल्यावर गुलियन बॅरी सिंड्रोम झाला. वोक्हार्ट रुग्णालयात या महिलेवर उपचार करण्यात आले. कोरोनामुक्त रूग्णाला हा आजार होणे हे दुर्मिळात दुर्मिळ आहे. वोक्हार्टच्या क्रिटिकल केअर विभागाचे प्रमुख डॉ. केदार तोरसकर आणि न्युरोलॉजिस्ट सल्लागार डॉ. रविंद्र ढोरे यांच्यासह डॉ. गौरव गुप्ता, डॉ. भुषण गोडसे, डॉ. गुरूदास पुंडपाल आणि डॉ. हनी सावला या डॉक्टरांच्या टीमने या महिलेवर यशस्वी उपचार केले आहेत.