
बॉलीवूड अभिनेत्रीचा पती आणि माजी क्रिकेटपटूची मुलगी हे दोघे गोव्यात लॉकडाऊन एंजॉय करत असल्याची बातमी आहे. अभिनेत्रीचा पती आणि क्रिकेटपटूची मुलगी हे दोघेही घटस्फोटीत आहेत. हे दोघेजण सुट्टी साजरी करायला गोव्यात गेले होते आणि लॉकडाऊनमुळे तिथेच अडकून पडले.
अत्यंत सुंदर अभिनेत्रींमध्ये गणना होणाऱ्या आदिती राव हैदरीचं लग्न सत्यदीप मिश्राशी झालं होतं.

मात्र त्यांनी काही वर्षांत वेगळं होण्याचं ठरवलं.

पेशाने फॅशन डिझायनर असलेल्या मसाबा गुप्ताचं लग्न दिग्दर्शक मधू मनतेना वर्माशी झालं होतं.

2019 साली या दोघांनी घटस्फोट घेतला होता. घटस्फोटानंतर मसाबा सत्यदीपच्या प्रेमात पडली आहे.

गेल्या अनेक दिवसांपासून हे दोघे एकमेकांना डेट करत असल्याचे कळाले आहे. या दोघांनी त्यांच्या प्रेमाची जाहीर कबुली अजून दिलेली नाहीये. सध्या हे दोघे गोव्यामध्ये लॉकडाऊन एंजॉय करत असल्याचे कळाले आहे.



























































