लॉकडाऊन व नंतरच्या मागणीसाठी इंडियन ऑईल सज्ज; पेट्रोल-डिजेलची मागणी घटली, तर घरगुती गॅसची मागणी वाढली

344

कोरोना व्हायरसच्या उद्रेकामुळे पेट्रोल डिझेलची मागणी कमी झाली असली तरी स्वयंपाकाच्या गॅसची मागणी वाढलेली असून वाढत्या गॅसच्या मागणीचा पुरवठा करण्यासाठी इंडियन ऑईल कार्पोरेशनने गॅस निर्मिती, वितरण आणि पुरवठा करण्याची क्षमता वाढवली आहे. त्याच बरोबर पेट्रोल डिझेल व अन्य पेट्रोलियम उत्पादनेही कारोना व्हायरसपासून सुरक्षीत पध्दतीने ग्राहकांपर्यंत पोहोचवण्याची सर्वतोपरी व्यवस्था केलेली आहे.

कोरोनाच्या उद्रेकामुळे पेट्रोल, डिझेल, इंधन तेल, बिटूमेन इत्यादी पेट्रोलियम उत्पादनांची मागणी कमी झाल्यामुळे इंडियन ऑइलने आपल्या बऱ्याच रिफायनरीजमध्ये 25 ते 30 टक्के एवढेच क्रूड ऑइल नियतन ठेवले आहे. तर लॉकडाऊन संपल्यानंतर पेट्रोल डिझेल व अन्य पेट्रोलियम उत्पादनाची मागणी अचानक वाढेल हे लक्षात घेऊन आपले बल्क स्टोरेजही वाढवण्यात येत आहेत. बाजारपेठेत होतील त्या बदलानुसार सज्ज राहण्यास इंडियन ऑईल तत्पर आहे.

एलपीजीची वाढती मागणी
सध्या प्रमुख पेट्रो उत्पादनांची मागणी कमी असताना एलपीजी ‘स्वयंपाकाच्या गॅस’ची मागणी वाढली आहे. ही वाढती मागणी पूर्ण करण्यासाठी इंडियन ऑइल आपल्या प्रमुख रिफायनरीजमध्ये एलपीजीचे उत्पादन वाढविण्यासाठी पाऊल उचलले आहे. एलपीजी गॅसचे उत्पादन करणारे युनिट्स एफसीसी/इंडमॅक्स इत्यादीचे उत्पादन वाढवले आहे. बॉटलिंग प्लाँट ऑपरेशन्स आणि एलपीजी रिफील वितरण सुव्यवस्थित केले जात आहे. एलपीजी ग्राहकांसाठी आपातकालीन सेवा क्रमांक 1906 नेहमीप्रमाणे कार्यरत आहे. पुरेसा साठा उपलब्ध असून ग्राहकांना पॅनिक-बुकिंगची गरज भासणार नाही. ग्राहकांकरता 7588888824 या मोबाईल क्रमांकावर एसएमएस किंवा आयवीआरएस, व्हाटस अ‍ॅप करून बुकींग करता येईल. इंडियन ऑईल अ‍ॅप, सीएक्स इंडियन ऑईल डॉट इन वर ऑनलाईन विंâवा पेटीएमवरुन बुकींग करता येईल.

सप्लाय लाइनची देखरेख
गरजेप्रमाणे आपतकालीन इंधन पुरवठा करण्याची सर्व व्यवस्था करण्यात आलेली असून बॉटलिंग, स्टोरेज, इंन्स्टालेशन आदि सुविधा तत्पर ठेवण्यात आलेल्या आहेत. राज्य सरकार व स्थानिक प्रशासनाच्या मागणी व सल्ल्यानुसार अत्त्यावश्यक सेवा चालू ठेवण्यात आलेल्या आहेत. प्रत्येक इंधन स्टेशन्सवर वैयक्तिक स्वच्छता आणि सामाजिक अंतराचे नियम पाळून कर्मचारी काम करीत आहेत. कॉर्पोरेशने कर्मचारी, सेवा पुरवठा करणारे, कंत्राटी कामगार, पेट्रोल पंप, विक्रेता, ग्राहकसेवक, एलपीजी वितरण करणाऱ्या कर्मचाऱ्याच्या आरोग्य व अन्य सुरक्षेवर विशेष भर देण्यात आलेला आहे.

कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी…
कोरोनाशी मुकाबला करण्याच्या उपाययोजनांसाठी एक स्वतंत्र पथकच कार्यरत करण्यात आले आहे. सामाजिक अंतर पाळण्यात येत असून बहुसंख्य कर्मचारूपसाठी वर्क फ्रोम होम लागू केले आहे. क्रिटिकल रिफाईनिंग, पुरवठा आणि वितरण साखळीत सुरक्षा उपायांसह, स्वच्छतेसह पुरेसे कर्मचारी ठेवलेले आहेत. कर्मचाऱ्याची चोवीस तास शिफ्ट, अग्निशमन, सुरक्षा व वैद्यकीय बाबींसाठी पूरक मनुष्यबळ उपलब्ध केलेले आहे. कंत्राटी मजदूरांना कोरोना प्रतिबंधक उपायांसह फक्त आवश्यक आणि जरुरी कामांकरिता किमान आधारावर ठेवले आहे. प्रत्येक कर्मचाऱ्यासाठी हॅन्ड -सेनिटायझर आणि मास्क उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत. पेट्रोलियम उपादनांची वाहतूक करणाऱ्या ट्रक -टँकर चालकांसाठी बाबतीतही पुरेशी काळजी घेतली जात आहे. सर्व प्रकारच्या बैठका व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारेच होत आहे. पेट्रोल पंप व अन्य ठिकाणी कामाचे तास कमी करण्यात आले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या