‘मास्क’ला हिंदीमध्ये काय म्हणाल? बिग बींचं हैराण करणारं उत्तर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

‘बिग बी’अमिताभ बच्चन सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असतात. त्यांचे ब्लॉग्ज, ट्विट, फोटो आणि व्हिडीयोंच्या माध्यमातून ते चाहत्यांनी जोडलेले असतात. त्यांची प्रत्येक पोस्ट चर्चेत असते. यावेळी ते कोरोना मास्कमुळे चर्चेत आले आहेत. ‘मास्क’ हा इंग्रजी शब्द आहे. बिग बींनी मास्कला हिंदी शब्द शोधला आहे. मास्कचं त्यांनी केलेलं हिंदी भाषांतर ऐकून हैराण व्हाल.

अमिताभ यांनी मास्कला हिंदीमध्ये काय म्हणतात? किंवा त्याचा हिंदी अनुवाद करायचा असेल तर कसा कराल? असा प्रश्न बिग बींनी चाहत्यांना विचारला होता. या प्रश्नावर कुणालाच उत्तर देता आले नाही. त्यानंतर अमिताभ यांनीच या प्रश्नाचं उत्तर दिलं. मास्कला हिंदी भाषेत ‘नासिकामुखसंरक्षक कीटाणुरोधक वायुछानक वस्त्रडोरीयुक्तपट्टिका’ असं म्हणता येईल, असे त्यांनी पोस्ट केलं. त्यांचा हा अनुवाद वाचून नेटकरी चकित झाले आहेत. अमिताभ यांची ही पोस्ट सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनली आहे. त्यावर नेटिजन्स भरभरून प्रतिक्रिया देत आहेत.