देशातील विविध भागात वेगवेगळ्या वेळी होणार कोरोनाचा उद्रेक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

अनलॉक वन जाहीर केल्यानंतर कोरोना रुग्णांची संख्या वेगाने वाढत आहे. पंधराव्या वित्त आयोगाने उच्चस्तरीय समितीने दिलेल्या अहवालानुसार देशातील विविध भागात वेगवेगळ्या वेळी कोरोनाचा उद्रेक होऊ शकतो. देशातील कोरोना रुग्णांची संख्या अडीच लाखांवर पोहोचली आहे अशातच अनेक राज्यात वाढणाऱ्या रुग्ण संख्येबाबत चिंता व्यक्त केली जात आहे

कोरोनाचा सामना करण्यासाठी उपलब्ध असलेल्या साधनांचा बाबत राज्यांमध्ये योग्य ताळमेळ असायला हवा. यामुळे राज्यांना आरोग्य संबंधित सुविधा पुरविण्यास मदत होईल गरजेनुसार उपलब्ध साधने एका राज्यातून दुसऱ्या राज्यात पोहोचवता येण्यासाठी हे आवश्यक असल्याचे मत उच्चस्तरीय समितीचे संयोजक आणि एम्सचे संचालक डॉक्टर रणदीप गुलेरिया यांनी व्यक्त केले आहे.

वेगवेगळ्या प्रकारे कोरोना पसरतोय
काही राज्यात रुग्णांची वाढती संख्या रोखणे हे आव्हानात्मक आहे. वेगवेगळ्या राज्यात वेगवेगळ्या प्रकारे ही साथ पसरत आहे. महाराष्ट्र, गुजरात, मध्य प्रदेश, बंगाल आणि दिल्ली रुग्ण संख्येत सतत वाढ होत आहे

कोरोनाचा मृत्यु दर पाच टक्क्यांहून कमी हवा
इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च असे महासंचालक डॉक्टर बलराम भागावर यांनी कोरुना रुग्णांची संख्या वाढतच असून कोरोनाचा प्रभाव पुढील दोन ते तीन वर्षांपर्यंत कायम राहणार आहे. त्यामुळे कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूचा दर पाच टक्‍क्‍यांहून कमी ठेवणे आवश्यक आहे जर मृतांची संख्या दररोज हजार ते दोन हजार पर्यंत पोहोचली तर ते धोकादायक ठरू शकते असा इशारा त्यांनी दिला