
सांगलीतील रेठरे धरण येथे राहून गेलेली व्यक्ती मुंबईत कोरोनाबाधीत असल्याचे निष्पन्न झाल्यानंतर प्रशासनाने जलद हालचाली करून त्याचे कुटुंबीय आणि संपर्कात आलेल्या 24 जणांना मध्यरात्री तर इतर 6 जणांना सकाळी मिरज येथे दाखल केले. दाखल केलेल्या 30 जणांचे स्वॅब कोरोना चाचणीसाठी पाठवण्यात आले. यामधील 24 जणांचे स्वॅब निगेटिव्ह आले असून 6 जणांचा अहवाल प्रलंबित असल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी दिली.




























































