
सिंधुदुर्ग जिह्यात सोमवारी आणखी 13 रुग्ण बरे झाले आहे. त्यामुळे जिह्यात आता केवळ 12 रुग्ण ऍक्टिव्ह आहे. तर बरे झालेल्या रुग्णांची संख्या 143 झाली असून सिंधुदुर्ग जिल्हा कोरोनामुक्तिकडे वाटचाल करत असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. धनंजय चाकुरकर यांनी दिली.
सिंधुदुर्ग जिह्यातील एकूण रुग्णांची संख्या 160 एवढी झाली आहे. कोरोना रुग्ण सापडण्याचे प्रमाण कमी होणे जिह्यासाठी समाधानाची बाब आहे. तसेच जिह्यात कोरोनावर मात करणाऱ्या रुग्णांच्या संख्येत झपाटय़ाने वाढ होत आहे. सोमवारी आणखी 13 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. ते पूर्णत: बरे झाल्याने त्यांना सोमवारी डिस्चार्ज देण्यात आला. त्यामुळे बरे झालेल्या रुग्णांची संख्या 143 एवढी झाली आहे. जिह्यात बरे होणाऱ्या रुग्णाच्या संख्येत झपाटय़ाने वाढ होत आहे. तर ऍक्टिव्ह रुग्ण संख्येत घट होत आहे.
सिंधुदुर्ग जिह्यात आतापर्यंत 160 कोरोना बाधित रुग्ण आढळून आले आहेत. यातील 143 रुग्ण बरे झाले. आता केवळ 12 रुग्ण ऍक्टिव्ह असून जिल्हा कोरोना मुक्तीकडे वाटचाल करत आहे. 4 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर 1 रुग्ण मुंबईला उपचारसाठी गेला आहे. पाठविण्यात आलेले एकूण नमुने 3 हजार 222 पैकी अहवाल प्राप्त झालेले नमुने 3 हजार 175, आतापर्यंत पॉझिटीव्ह आलेले नमुने 160, निगेटीव्ह आलेले नमुने 3 हजार 15, अहवाल प्राप्त न झालेले नमुने 57, सद्दस्थितीत जिह्यातील सक्रिय रुग्ण 12, इतर जिल्हे व इतर राज्यातील रुग्ण 1 (मुंबई), मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या 4, डिस्चार्ज देण्यात आलेले रुग्ण 143, विलगीकरण कक्षात दाखल रुग्ण 29, सोमवार रोजी तपासणी करण्यात आलेल्या व्यक्ती 2 हजार 329, संस्थात्मक अलगीकरणातील व्यक्ती 20 हजार 216, शासकीय संस्थांमधील अलगीकरणातील व्यक्ती 77, गाव पातळीवरील संस्थात्मक अलगीकरणातील व्यक्ती 18 हजार 68, नागरी क्षेत्रातील संस्थात्मक अलगीकरणातील व्यक्ती 2 हजार 71, 2 मे 2020 रोजी पासून आतापर्यंत जिह्यात 1 लाख 6 हजार 158 व्यक्ति आले असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. धनंजय चाकुरकर यांनी दिली.
रत्नागिरीत आणखी दोन कोरोनाबाधितांचा मृत्यू; मृतांची संख्या 21 कर
रत्नागिरीत आणखी दोन कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे जिह्यात कोरोनाबाधित मृतांची संख्या 21 वर पोहचली आहे. जिह्यात आतापर्यंत 484 कोरोनाबाधित रूग्ण सापडले असून 111 रूग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्हा कोविड रुग्णालयामध्ये दोन रुग्णांचा मृत्यू झाला. यामध्ये रत्नागिरी तालुक्यांतील शिरगाव येथील पुरुष रुग्णाला (65) किडनी व मधुमेहाचा आजार होता तसेच संगमेश्वर तालुक्यातील वाडवली येथील महिला रुग्ण (42) यांचा उपचारादरम्याने मृत्यू झाला. हे दोन्ही रुग्ण मुंबईतून आले होते कोविड केअर सेंटर समाजकल्याण रत्नागिरी येथून दोन रुग्णांना तर जिल्हा कोविड रुग्णालय येथून दोन रुग्ण अशा एकूण चार रुग्णांना बरे झाल्याने घरी सोडण्यात आले. बरे झालेले रुग्णांची संख्या 353 झाली आहे.



























































