एका दिवसात 13 हजार 408 कोरोनामुक्त; 12 हजार 712 नवीन रुग्ण

194

कोरोनातून बरे होणाऱयांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. राज्यात बुधवारी तब्बल 13 हजार 408 इतक्या मोठय़ा संख्येने रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. एकूण 3 लाख 81 हजार 843 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. 12 हजार 712 नविन रुग्णांचे निदान झाले असून रुग्ण बरे होणाचे प्रमाण 69.64 टक्के एवढे आहे. सध्या 1 लाख 47 हजार 513 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. राज्यात बुधवारी 344 मृत्यूंची नोंद झाली असून मृत्यूदर 3.4 टक्के इतका आहे. आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या 29 लाख 8 हजार 887 नमुन्यांपैकी 5 लाख 48 हजार 313 नमुने पॉझिटिव्ह (18.84 टक्के) आले आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या