
कोरोना संकटादरम्यान फटाक्यांमुळे रुग्णांच्या त्रासात आणखीन वाढ होऊ शकते. त्यामुळे दिवाळीत फटाके वाजविण्यावर बंदी घालण्याचा निर्णय राजस्थान सरकारने घेतला आहे. मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी ट्विट करत या निर्णयाची माहिती दिली आहे.
फटाक्यांमधून निघणाऱया विषारी वायूपासून कोरोनाबाधित रुग्ण आणि सर्वसामान्यांच्या आरोग्याच्या रक्षणासाठी फटक्यांची विक्री आणि आतषबाजीवर बंदी घालण्यात आली आहे. लोकांनी आतषबाजीपासून लांब राहायला हवे. तसेच लग समारंभ आणि इतर सोहळय़ांतही आतषबाजी बंद करायला हवी, असे आवाहनही गेहलोत यांनी केले आहे.




























































