
देशात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याबद्दल एकीकडे चिंता व्यक्त केली जात आहे. तर दुसरीकडे कोरोना संकटातही 2021मध्ये कुंभमेळा भरविण्याची तयारी उत्तराखंड सरकारने सुरू केली आहे. मुख्यमंत्री त्रिवेंद्रसिंह रावत यांनी हरिद्वारमध्ये होत असलेला हा कुंभमेळा भव्यदिव्य होईल, अशी घोषणा केली आहे.
हरिद्वार कुंभमेळ्याच्या आयोजनाबाबत मुख्यमंत्र्यांच्या सरकारी निवासस्थानी आखाडा परिषदेसोबत एक बैठक पार पडली. यावेळी मुख्यमंत्री त्रिवेंद्रसिंह रावत यांनी कुंभची वर्षानुवर्षांची परंपरा आणि संस्पृतीचा मान राखला जाईल, असे सांगितले. अखिल भारतीय आखाडा परिषदेचे अध्यक्ष महंत नरेंद्र गिरी यांनी कुंभमेळ्याच्या यशस्वी आयोजनासाठी राज्य सरकारला संपूर्ण सहकार्य करण्याचे आश्वासन यावेळी दिले.
कुंभच्या कामाची वेळोवेळी समीक्षा केला जात आहे. हे काम सध्या प्रगतिपथावर आहे. लवकरात लवकर हे काम पूर्ण करण्यासाठी संबंधित विभागीय सचिवांना नियमित पाहणीचे निर्देश देण्यात आलेले आहेत. कुंभमेळ्यापूर्वी स्वच्छता, अतिक्रमणे हटविणे, पार्पिंगसाठी व्यवस्था निर्माण करणे अशी कामे पूर्ण करण्यात येतील. कुंभ सुरू होताना परिस्थिती कशी आहे हे ध्यानात घेऊन कुंभमेळ्याच्या स्वरूपाचा विस्तार केला जाईल, असे मुख्यमंत्री रावत यांनी स्पष्ट केले आहे.

























































