महाराष्ट्रानंतर तामिळनाडूनेही 31 मेपर्यंत लॉकडाऊन वाढविला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

महाराष्ट्रानंतर दक्षिण हिंदुस्थानातील राज्य तामिळनाडूनेही 31 मे पर्यंत लॉकडाऊन वाढविला आहे. महाराष्ट्राप्रमाणे तामिळनाडूतही कोरोना रुग्णाची संख्या दिवसागणिक वाढत आहे. दरम्यान तिसऱ्या टप्प्यातील लॉकडाऊनची मुद्दत आज संपणार आहे. ‘आज तक’ने दिलेल्या वृत्तानुसार, केंद्र सरकार आज लॉकडाऊन 4 च्या तरतुदी आणि नियम जाहीर करणार आहे. यापूर्वी महाराष्ट्र आणि तामिळनाडूने 31 मेपर्यंत लॉकडाऊन सुरू ठेवण्याची घोषणा केली आहे.

तामिळनाडूमध्ये कोरोनाचे 10 हजाराहून अधिक रुग्ण

तामिळनाडूमध्ये कोरोनाच्या रुग्णांनाची ही 10 हजाराहून अधिक झाली आहे. आरोग्य मंत्रालयाच्या ताज्या आकडेवारीनुसार तामिळनाडूमध्ये कोरोना रुग्णाची एकूण 10585 इतकी आहे. येथे 3538 रुग्ण उपचारानंतर बरे झाले आहेत. तर 74 रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.

पुढील आदेश येईपर्यंत तमिळनाडूमधील पूजास्थळे पूर्णपणे बंद राहतील. बार, जिम, समुद्रकिनारे, उद्याने, जलतरण तलाव, सभागृहही बंद राहतील. सामान्य रेल्वे सेवा चालणार नाही. सरकारने दिलेल्या आदेशाव्यतिरिक्त सार्वजनिक बस वाहतूकही बंद ठेवण्यात येणार आहे. राज्यात पुढील आदेश होईपर्यंत शाळा व महाविद्यालयेही बंद राहतील.