स्थलांतरित मजूरना जेवणाच्या तटावरून हुसकावले; संबंधितांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी 

1119

देशभरात लॉकडाऊनच्या काळात अडकलेल्या गरजू लोकांना मदतीचा हात देऊन माणुसकीचे दर्शन घडविले जात असताना भिवंडी तालुक्यातील दाभाड गावातील तुकाराम वाडी येथे जेवायला बसलेल्या मजूरांना भरलेल्या ताटावरून उठवून इथून चालते व्हा, असे सांगत या आदिवासी मजूरांना अक्षरशः हाकलून लावल्याची घटना घडली आहे. या घटनेमुळे परिसरात संतापाची लाट उसळली असून संबधीतांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याची मागणी होत आहे.

देशामध्ये कोरोनाच्या प्रादुर्भावावर नियंत्रण मिळावे म्हणून 22 मार्च पासून लॉकडाऊन आहे. अचानक लॉकडाऊन झाल्याने जनजीवन विस्कळीत झाल्याची स्थिती निर्माण झाली आहे. मात्र या सगळ्या प्रक्रियेत सगळ्यात जास्त कामगार वर्ग व स्थलांतरीत कामगार होरपळून निघाला आहे तर  हातावर पोट असणारा वीटभट्टी कामगार आणि  नाक्यावर काम करण्यासाठी गेलेला स्थलांतरित मजूर यात भरडले गेले आहेत.

शटडाऊन मुळे अडकलेले 6 कामगार  मजूर कुटुंब आपल्या मुलाबाळांसह घराच्या दिशेने पायी अनेक मैलांचे अंतर तुडवत निघाले होते. या मजुरांबाबत माहिती मिळताच त्यांना दाभाड येथील तुकाराम वाडीतील आप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या बैठकीचे अधिष्ठान हॉल समोर असलेल्या अंगणात या मजुरांना थाबवले आणि त्यांच्या जेवणाची सोय करण्यात आली.. मात्र या मजुरांना जेवण वाढत असताना या हॉलपासून 100 फूट अंतरावर घर असलेल्या यशवंत बाळू घरत यांच्या कुटुंबाने अक्षरशः गोंधळ घातला. आमच्या अंगणात जेवायचे नाही, इथून चालते व्हा, येथे अजिबात बसायचे नाही, थांबायचे नाही,चालते व्हा, गाडीत जेवायला द्या, स्वतःच्या घरी न्या असे सांगत, हे आदिवासी मजूर कुठून आलेत, त्यांना आताच्या आता हाकला इथून आशा प्रचंड आवाजात या लोकांनी वाद घातल्याचा आरोप प्रमोद पवार यांनी केला आहे. यावेळी उपस्थित अलेल्या गावचे पोलीस पाटील, स्थानिक कार्यकर्ते आले ते ही घरत कुटूंबाला समजावत होते की जेवतील आणि जातील पण कोणीही ऐकायला तयार नव्हते, त्यामुळे अशा आणिबाणीच्या काळात समाजविरोधी वर्तन करणाऱ्या या घरत कुटुंबीयान विरोधात कायदेशीर कारवाई करणार असेही पवार यांनी स्पष्ट केले.

आपली प्रतिक्रिया द्या