लेक माहेरी कोरोना घेऊन आली; बेस्टच्या परळ वसाहतीमध्ये खळबळ

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

बेस्टच्या परळ वसाहतीमध्ये माहेरी राहण्यास आलेली एका महिलेला आणि तिची तीन वर्षांची लेक कोरोना पॉझिटीव्ह आढळल्याने खळबळ उडाली आहे. परळ आणि गणेश गल्ली लालबाग अशा माहेर आणि सासरच्या मंडळींना क्वारंटाईन करण्यात आले आहे. विमानतळावर काम करणाऱ्या संबंधित महिलेचा पती कोरोना पॉझिटीव्ह आला आहे. त्यापूर्वी खबरदारी म्हणून माहेरी परळ बेस्ट वसाहतीमध्ये आलेल्या त्याच्या पत्नी आणि मुलीलाही कोरोनाने घेरल्याने परळ बेस्ट वसाहतीमधील के- इमारत सिल करण्यात आली आहे.

आपल्या मुलगीसह परळ येथील बेस्ट वसाहतीमध्ये वडीलांकडे रहाण्यास आली होती.  तिचे वडिल बेस्टमध्ये कार्यरत आहेत.  दरम्यान, पतीला कस्तुरबा रुग्णालयात दाखल करण्यात आले असून तर मुलगी, आई आणि पत्नी यांना हीरानंदनी रुग्णालयात दाखल करण्यात आले असल्याची माहिती स्थानिक नगरसेवक आणि बेस्ट समिती सदस्य अनिल कोकीळ यांनी दिली आहे. या इमारतीचे निर्जुतीकिरण करण्याचे काम करण्यात येणार आहे. त्या कुटुंबाच्या संपर्कात येणाऱ्या लोकांची माहिती गोळा करण्यात येत आहे. माहेरच्या लोकांना म्हणजे महीलेचे वडील, आई, भाऊ आणि आजीलाही क्वारंटाईन करण्यात आले आहे.