दुचाकी वर राजस्थान गाठण्याचा प्रयत्न अयशस्वी, पोलिसांनी सहा जणांना घेतले ताब्यात

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

दुचाकीवर राजस्थानला निघालेल्या 6 दुचाकीस्वारांवर श्रीगोंदा पोलिसांची कारवाई केली आहे. पोलिसांची नजर चुकवून राजस्थानला जात असताना नाक्यावर पोलिसांनी त्यांना पकडले असून या सहा जणांच्या विरोधात श्रीगोंदा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.

लांगाराम कुमावत ,जठराम कुमावत ,धनुराम कुमावत,अंबाराम कुमावत,कमलाराम कुमावत ,हेमराज कुमावत हे सहा जण तीन दुचाकी घेऊन राजस्थान ,जिल्हा बाडमेर च्या दिशेने प्रवास करत निघाले होते .ते श्रीगोंदा तालुक्याच्या हद्दीत आल्यानंतर पोलिसांनी लोणी व्यंकनाथ शिवारात चेक पोष्ट वर त्यांना ताब्यात घेतले. यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.अश्याच प्रकारे अनेक जण प्रवास करत आहेत .राजस्थान राज्यपर्यंत प्रवास करत जाण्याचा त्यांचा मानस होता मात्र हा प्रयत्न अयशस्वी ठरला आणि साथ रोग प्रतिबंध कायद्याच्या नुसार गुन्हा ही दाखल झाला आहे.