थोडी खुशी थोडा गम! विद्यार्थी डिजिटल ‘लॉक डाऊन’मध्ये

323

कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे राज्यभरातील विद्यार्थी सध्या डिजिटल लॉक डाऊनमध्ये आहेत. सध्याची परिस्थिती पाहता पुढील दोन महिने तरी शाळांचे प्रत्यक्ष वर्ग भरणे शक्य नसल्याने काही शाळांनी व्हर्च्यूअल म्हणजे डिजिटल वर्ग भरवण्यास सुरुवात केली आहे. या डिजिटल वर्गांना विद्यार्थ्यांचा संमिश्र प्रतिसाद मिळत असून काहीसे ‘थोडी खुशी थोडा गम’ असे वातावरण विद्यार्थ्यांमध्ये पाहायला मिळत आहे. येत्या 1 जूनपासून बहुसंख्य शाळांचे डिजिटल वर्ग नियमित सुरू होणार असून या वर्गांना विद्यार्थ्यांच्या 100 टक्के उपस्थितीचे आव्हान शाळांसमोर आहे.

डी. एस. हायस्कुल अध्यक्ष राजेंद्र प्रधान यांनी शाळेच्या नियमित डिजिटल वर्गांची माहिती देताना सांगितले की, ‘चालू शैक्षणिक वर्षात अभ्यासक्रम पूर्ण शिकवण्याचे आव्हान शाळांसमोर आहे. त्यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून आम्ही प्रायोगिक पातळीवर ‘झूम’ या मोबाइल अ‍ॅपवर पहिली ते दहावीचे वर्ग एप्रिल व मे महिन्यात घेतले. काही तुकड्यांमध्ये विद्यार्थ्यांची उपस्थिती 95 टक्के असायची, तर काही तुकड्यांमध्ये 60-70 टक्के. त्यामुळे आता 1 जूनपासून झूम अ‍ॅपवर दररोजच्या 40 मिनिटांच्या प्रत्येकी चार तासिकांना विद्यार्थ्यांची उपस्थिती 100 टक्के लागावी, यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत.

विद्यार्थी अभ्यास करतात हे कसे समजणार?

डिजिटल वर्गात विद्यार्थी अभ्यास करतात का हे शिक्षकांना समजणे खूपच कठीण असल्याचे कुलाबा महापालिका माध्यमिक शाळेचे मुख्याध्यापक अंंबरिंसग मगर यांनी सांगितले. माझ्या शाळेत दहावीचे 130 विद्यार्थी आहेत. त्यातील 67 विद्यार्थीच डिजिटल वर्गात हजेरी लावत आहेत. उर्वरित विद्यार्थ्यांच्या कुटुंबियांचा लॉक डाऊनमुळे रोजगार बंद आहे. त्यामुळे अशा पालकांनी गावचा रस्ता धरला आहे. याशिवाय डिजिटल वर्ग हा कमीतकमी 40 मिनिटांचा असतो. वर्गात हजेरी लावल्यानंतर दिवसभर विद्यार्थी काय करतात, असा सवाल मगर यांनी उपस्थित केला.

समुपदेशिका प्राजक्ता भाटकर यांनी विद्यार्थ्यांसाठी सुचविलेले काही उपाय –

  • घर कितीही लहान असले तरी मुलांकडून पालकांनी सूर्यनमस्कारसारखे शारीरिक व्यायाम करवून घ्यावे.
  • मुलांसोबत बैठे खेळ खेळून तसंच सहज गप्पा-टप्पा मारत त्यांच्याशी सतत संवाद साधणंही महत्त्वाचे आहे.
  • मुलांमध्ये सकारात्मक दृष्टिकोन आणि दुर्दम्य इच्छाशक्ती निर्माण करण्यावर घरातील वडिलधाऱ्यांनी विशेष लक्ष द्यायला हवे.

प्रत्यक्ष वर्गातील शिक्षणच प्रभावी

ई-ला\नग हा केवळ एक पर्याय आहे. प्रत्यक्ष वर्गातील शिक्षणच जास्त प्रभावी असल्याचे शिक्षक राजेश पांड्या यांनी सांगितले. एखादा धडा शिकवताना विद्याथ्र्यांना येणाऱ्या समस्यांचे निवारण करणेही जरुरी आहे. वर्गात विद्यार्थी आणि शिक्षक यांच्यात संवाद होत असतो. मात्र तसा संवाद डिजिटल वर्गात होणार नाही, अशी खंत पांड्या यांनी व्यक्त केली.

आपली प्रतिक्रिया द्या