
पुणे जिल्हयातील कोरोना बाधीत रुग्णांची संख्या 2926 झाली आहे. 1139 कोरोना बाधीत रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 1630 आहे. पुणे जिल्हयात कोरोनाबाधीत एकूण 157 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच 107 रुग्ण गंभीर असून उर्वरीत निरीक्षणा खाली आहेत, अशी माहिती पुणे विभागीय आयुक्त्त डॉ. दिपक म्हैसकर यांनी दिली आहे.
विभागातील कोरोना बाधीत रुग्णांची संख्या 3365 झाली आहे. विभागातील 1237 कोरोना बाधीत रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 1953 आहे. विभागात कोरोनाबाधीत एकूण 175 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच 115 रुग्ण गंभीर असून उर्वरीत निरीक्षणाखाली आहेत. रविवारच्या बाधीत रूग्णाच्या संख्येच्या तुलनेत बाधीत रूग्णाच्या संख्येमध्ये पुणे जिल्हयात 96 सोलापूर जिल्हयात 26 तर सांगली जिल्हयात 1 रूग्णाची वाढ झालेली आहे. तर सातारा व कोल्हापूर जिल्हयात कोणतीही वाढ झालेली नाही.
आजपर्यत विभागामध्ये एकूण 34064 नमूने तपासणीसाठी पाठविणेत आले होते. त्यापैकी 32366 चा अहवाल प्राप्त आहे. 1671 नमून्यांचा अहवाल प्रतीक्षेत आहे. प्राप्त अहवालांपैकी 28969 नमून्यांचा अहवाल निगेटीव्ह असून 3365 चा अहवाल पॉझिटिव्ह आहे. तसेच विभागामधील 92,99,876 घरांचे सर्वेक्षण पूर्ण करण्यात आले असून त्याअंतर्गत 4,02,32,714 व्यक्तींची तपासणी केली आहे. त्यापैकी 2176 व्यक्तींना अधिक तपासणीसाठी संदर्भीत करण्यात आले आहे.
परदेशातून आलेल्या व्यक्तीचे विलगीकरण
रविवारी परदेशातून एकूण 141 व्यक्तीचे विभागामध्ये आगमन झालेले आहे. या सर्वांचे संस्थात्मक विलगीकरण करण्यात आलेले आहे.
































































