
राज्यात कोरोना व्हायरस चा प्रसार वाढत आहे. अशा परिस्थितीत जीवनावश्यक गोष्टी जरी बंद नाही झाल्या तरीही या आवश्यक वस्तूच्या पुरवठयावर नक्कीच परिणाम झाला आहे. त्यामुळे शासनाने स्वस्त धान्य दुकानातून जीवनावश्यक वस्तू पुढील 2 महिन्याच्या नागरिकांना ह्याच महिन्यात उपलब्ध करून द्यावे असे निर्देश विधान परिषदेच्या उपसभापती डॉ नीलम गोऱहे यांनी प्रशासनाला दिले. दोन महिन्यांच्या जीवनावश्यक वस्तू ह्याच महिन्यात उपलब्ध करून दिल्यास नागरिकांना जीवनावश्यक वस्तू मिळविण्यासाठी घराबाहेर पडण्याची आवश्यकता भासणार नाही. त्यानुसार अन्न व नागरी पुरवठा मंत्रालयाने तात्काळ दखल घेतली असून या बाबत आजच आदेश काढण्यात आला आहे.

































































