कोरोना नियंत्रणात, वरळीची प्रतिबंधातून सुटका होतेय!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

एकावेळी कोरोना हॉटस्पॉट ठरलेल्या पालिकेच्या वरळी प्रभागात आता कोरोना चांगलाच नियंत्रणात आला आहे. यामुळे संपूर्ण जी-दक्षिण विभागात आता फक्त 5 कंटेनमेंट झोन शिल्लक असून सील इमारती-इमारतींच्या भागांची संख्या 166 पर्यंत खाली आहे. प्रभागात आता 862 ऑक्टिव्ह रुग्ण उरले आहेत. वरळीत एकूण रुग्णसंख्या 4734 झाली असली तरी यातील 3780 जण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. या ठिकाणी आता केवळ 862 ऑक्टिव्ह रुग्ण आहेत.

पालिकेच्या जी-दक्षिण म्हणजेच वरळी, लोअर परळ, प्रभादेवी आणि एल्फिंस्टन रोड आदी भागांत अनेक ठिकाणी असणाऱया दाटीवाटीच्या वस्तीमुळे क्लोज काँटॅक्टमुळे कोरोनाचा प्रसार वेगाने होत गेला. मात्र या विभागात प्रभावी क्वारेंटाइन, निर्जंतुकीकरण, अनेक सार्वजनिक शौचालयांमध्ये स्वयंचलित निर्जंतुकीकरण, घरोघरी तपासणी, ‘डॉक्टर आपल्या दारी’, ‘फाइट द बाईट’ अशा उपक्रम राबवल्यामुळे कोरोना नियंत्रणात आला आहे. यामध्ये वरळी ‘एनसीआय’ डोम आणि पोदार रुग्णालयात सुरू केलेल्या अत्याधुनिक सुविधाक्त जम्बो आरोग्य सुविधाही महत्त्वपूर्ण ठरल्याची माहिती जी-दक्षिणचे सहायक आयुक्त शरद उघडे यांनी दिली. वरळीत रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी 87 दिवसांवर गेला असून सरासरी वाढ 0.80 पर्यंत खाली आली आहे.

‘एनएससीआय’, ‘पोदार’मध्ये फक्त 425 रुग्ण

संपूर्ण वरळी प्रभागातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आणि निकट संपर्प संशयितांना प्रभागातच क्वारेंटाइन, उपचार करता यावेत यासाठी वरळी ‘एनएससीआय’ डोममध्ये 2420 खाटांची सुविधा निर्माण करण्यात आली. तर पोदार रुग्णालयात 951 रुग्ण दाखल करण्यात आले. मात्र आता रुग्णसंख्या नियंत्रणात आल्यामुळे पोदार रुग्णालयात फक्त 115 रुग्ण आहेत तर ‘एनएससीआय’ डोममध्ये 310 असे एपूण 425 रुग्ण उपचार घेत आहेत. दरम्यान, जी दक्षिण विभागात कोरोनामुळे 367 जणांचा मृत्यू झाला आहे.