‘रामायण’ आणि ‘महाभारत’नंतर ‘शक्तिमान’ येतोय प्रेक्षकांच्या भेटीला

2853

90 च्या दशकामध्ये हिंदुस्थानाला पहिला सुपरहिरो मिळाला. एक असा सुपरहिरो ज्याची वाट लहान मुलांसह घरातील वृद्ध व्यक्तीदेखील पाहत होते. हा सुपरहिरो म्हणजे ‘शक्तिमान’. अभिनेता मुकेश खन्ना यांनी साकारलेली ही भूमिका लहान मुलांच्या आवडीची बनली होती. या मालिकेला बंद होऊन बरीच वर्षं होऊन गेली आहेत. मात्र आता पुन्हा एकदा शक्तिमान प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. कोरोना प्रसार रोखण्यासाठी देशात लॉकडाऊन असल्याने लोक मोठ्या प्रमाणावर टीव्ही आणि इंटरनेट वर आपला वेळ व्यतीत करत आहे. अशातच दूरदर्शनने रामायण आणि महाभारतचे प्रसारण सुरू केले आहे. आता लवकरच दूरदर्शनवर शक्तिमानचेही प्रसारण सुरु होणार आहे, अशी माहिती मुकेश खन्ना यांनी एका व्हिडीओच्या माध्यमातून दिली आहे.

मुकेश खन्ना यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवर हा व्हिडीओ शेअर करून ही माहिती दिली आहे. ते या व्हिडीओत म्हणाले आहे की, लवकरच शक्तीमानचा सिक्वेल येणार आहे. मात्र नेमकं हा कार्यक्रम छोट्या पडद्यावर कधी पाहायला मिळणार आहे. याबाबत त्यांनी सांगितलेले नाही आहे. बॉम्बे टाईम्सशी बोलताना ते म्हणाले, मागील तीन वर्षांपासून आम्ही शक्तीमानच्या सिक्वेलवर काम करत आहोत. आम्ही शक्तीमानचा सिक्वेल बनवत आहोत, कारण नंतर काय घडले हे लोकांना जाणून घ्यायचे आहे. मला वाटतं परिस्थिती बदलताच आम्ही लवकरच हा कार्यक्रम आणू, कारण यावेळी प्रेक्षकांकडून शक्तीमानची खूप मागणी आहे.

आपली प्रतिक्रिया द्या