नागपूरमध्ये आढळला कोरोनाचा आणखीन एक पॉझिटिव्ह रुग्ण

शहरातील खामला परिसरात राहणार युवक कोरोना बाधीत आढळला असून तो कोरोना पॉझिटिव्ह आहे. शहरातील पॉझिटिव्ह रूग्णांची संख्या आता पाच झाली आहे,

हा युवक दुकानाच्या खरेदी साठी 16 मार्च रोजी दिल्ली भेथे गेला होता. 18 मार्चला तेंलगना एक्सप्रेसने नागपूरला आला. दोन दिवसांपासून त्याला श्वास घेण्यास त्रास होत होता म्हणून त्याला मेयो रुग्णालयात तपासण्यात आले. त्याची कोरोना टेस्ट केली तेव्हा ती टेस्ट निगेटिव्ह आली. गुरुवारी दुपारी एका टेस्टचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. ही माहिती मिळताच खामला परिसरात खळबळ माजली, प्रशासनाने हा युवक जेथे राहतो तो भाग सिल केला आहे. या युवकाकाच्या संपर्कात आलेल्या सर्वाची तपासणी सुरू आहे.

आपली प्रतिक्रिया द्या