
राज्याची उपराजधानी असलेल्या नागपुरात कोरोनाग्रस्तांच्या संख्येने आज शंभरी गाठली आहे. 52 वर्षीय पुरुष आणि 50 वर्षीय महिलेचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आल्याने नागपुरातील कोरोना बाधितांची एकूण संख्या 100 वर पोहोचली आहे. गेले दोन दिवस बाधिताचा आकडा 98 वर होता त्यामुंळे नागपूरकरांना दिलासा मिळाला होता, संतरजीपूरा येथील मृतका संपर्कामध्ये अनेक जणांचे अहवाल अदयाप यायचे आहे, त्यानंतर बाधिताची संख्या वाढण्याची शक्यता आहे, याच व्यक्तीने आता पर्यत 56 लोकांना बाधीत केले आहे.
आज नव्याने आढळलेल्या रुग्णांपैकी एक जण सतरंजीपुरा तर एक मोमीनपुरा येथील आहे. बाधित रुग्णाच्या संपर्कात आल्याने ते कोरोना पॉझिटिव्ह झाल्याची माहिती आहे. या दोन्ही रुग्णांना इतर रुग्णांप्रमाणेच आधीच क्वारंटाईन करण्यात आले होते. गुरुवारी दिवसभरात नागपुरात एकही नवा कोरोना रुग्ण समोर आला नव्हता. ज्यामुळे, कोरोना बाधितांची संख्या 98 वर स्थिरावली होती. नागपुरात कोरोनाचा पहिला रुग्ण 12 मार्चला समोर आला होता. त्यानंतर 43 दिवसात हा आकडा शंभरावर पोहोचला आहे.
रुग्णांची संख्या –
एकूण पॉझिटीव्ह नमुने – 100
मृत्यू – 01,
डिस्चार्ज मिळालेले रुग्ण – 15,
रुग्णालयात उपचार सुरू असलेले रुग्ण – 84
19 एप्रिलला 10, वीस एप्रिलला 7, 21 एप्रिलला 14,22 एप्रिलला 4,24 एप्रिलला 2 पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद झात्नी आहे.

































































