आरपीएफ जवानाने महिलेचे प्राण वाचविले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

धावत लोकल पकडत असताना एका महिलेचा तोल जाऊन ती पडण्याच्या बेतात असताना मदतीसाठी धावत आलेल्या मध्य रेल्वेच्या आरपीएफ जवानाच्या जलद हालचालीने या महिलेचे प्राण बचावल्याची घटना हार्बरच्या कॉटनग्रीन स्थानकात मंगळवारी सकाळी घडली.

मध्य रेल्वेच्या हार्बर मार्गावरील कॉटनग्रीन स्थानकातील प्लॅटफॉर्म क्र. 1 वर पनवेलला जाणाऱ्या लोकलच्या सीएसएमटी एण्डला सकाळी 9.19 वाजता एक महिला चालत्या लोकलमध्ये चढत होती. त्यावेळी ट्रेन सुरू झाल्याने ती खाली कोसळण्याच्या बेतात होती. इतक्यात डय़ुटीवर असलेले आरपीएफ कॉन्स्टेबल सरदार सिंह यांनी चपळाईने पुढे जात त्यांना आधार देण्याचा प्रयत्न केला आणि गार्डच्या निदर्शनास आणले. यावेळी डय़ुटीवरील गार्ड नितेश चंद्र कुमार यांनी ब्रेक दाबून लोकल थांबविली. त्यानंतर या महिलेला पुन्हा लोकलमध्ये सुखरूपपणे बसविण्यात येऊन लोकल पुढील प्रवासासाठी रवाना करण्यात आली.