
एकीकडे ऋषभ पंत, यशस्वी जैसवाल, केएल राहुल आणि शुभमन गिल यांनी इंग्लंडविरुद्ध धुवाधार फलंदाजी करत शतक ठोकली. तर दुसरीकडे काऊंटी चॅम्पियनशिपमध्येही टीम इंडियाचे खेळाडू आपल्या तडाखेबाज फलंदजीच प्रदर्शन करत आहेत. काल इशान किशनने आणि आज तिलक वर्माने आपल्या पदार्पणाच्या सामन्यात गोलंदाजांना चोपून काढलं आहे.
हॅम्पशायर या क्लबकडून तिलक वर्मा मैदानात उतरला आहे. एसेक्स काऊंटी क्रिकेट क्लबविरुद्ध तिलक वर्माने आपलं काऊंटी क्रिकेटमध्ये पदार्पण केलं. 34 धावांवर 2 विकेट अशी दयीनय अवस्था हॅम्पशायर संघाजी झाली होती. तेव्हा तिलक वर्मा मैदानात उतरला आणि त्यांनी संयमाने फलंदाजी करत संघाची सुत्र आपल्या हाती घेतली. या पहिल्याच सामन्यात त्याने 239 चेंडूंचा सामना 11 चौकार आणि तीन षटकारांच्या मदतीने आपलं शतक पूर्ण केलं. काऊंटी क्रिकेमधील त्याच हे पहिलच शतक असून प्रथम श्रेणी क्रिकेटमधील आठवं शतक ठरलं आहे. या शतकासोबत काऊंटी क्रिकेटमध्ये पदार्पणताच शतक ठोकणाऱ्या काही मोजक्या हिंदुस्थानी फलंदाजांच्या यादीत तिलक वर्माचा समावेश झाला आहे. यापूर्वी हा पराक्रम पीयूष चावला, अजिंक्य रहाणे आणि मुरली विजय यांनी केला आहे.
इशान किशनच इंग्लंडमध्ये धुमशान, पदार्पणाच्या सामन्यात केली धुवाधार फलंदाजी