नगरमध्ये कर्जमंजुरीचे आमिष दाखवून 1 लाख 80 हजाराची फसवणूक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । नगर

उद्योग व्यवसाय सुरु करण्यास जिल्हा उद्योग केंद्रामार्फत कर्जप्रकरण मंजुर करुन देतो असे सांगून पती-पत्नीने वेळोवेळी 1 लाख 80 हजार रुपये घेऊन कर्ज मंजुर न करता तसेच पैसे माघारी देण्यास नकार देऊन फसवणुक केल्याची घटना जुलै 2018 ते ऑगस्ट 2018 दरम्यान वेळोवेळी घडली.

अनिकेत रविंद्र राठोड हा बेरोजगार असल्याने नोकरी व्यवसायाच्या शोधात होता, त्यास सुरज शशिकांत मेहेत्रे व पुजा सुरज मेहेत्रे यांनी त्यास उद्योग व्यवसाय सुरु करण्यासाठी आम्ही जिल्हा उद्योग केंद्रातून कर्ज प्रकरण मंजूर करुन देतो असे सांगून त्याच्याकडून वेळोवेळी सुमारे 1 लाख 80 हजार रुपये घेऊन त्याचे कर्जप्रकरण मंजुर केले नाही. याबाबत त्याने विचारणा केली असता त्यास उडवाउडवीची उत्तरे दिली. म्हणून अनिकेत याने दोघांकडे दिलेल्या पैशांची मागणी केली असता त्यांनी पैसे देण्यास नकार दिला व शिवीगाळ करुन जीवे ठार मारण्याची धमकी दिली.

आपली फसवणुक झाल्याचे निदर्शनास येताच अनिकेत राठोड याने पोलिसांकडे धाव घेतली. याप्रकरणी तोफखाना पोलिसांनी अनिकेत राठोड याच्या फिर्यादीवरुन  गुन्हाची नोंदवला आहे.