‘टल्ली’ कपलने मारली तिसऱ्या मजल्यावरून उडी, थोडक्यात बचावले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

राजस्थानमधील जयपूर येथे झोटवाडामध्ये दारु पिऊन टल्ली झालेल्या प्रियकर व प्रेयसीने नशेत इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरून उडी मारल्याची धक्कादायक घटना घडली आहे. दोघांना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. या दोघांचे वय २० वर्ष आहे. यातील तरुणाला पायाला दुखापत झाली असून तरुणीच्या पाठीला मुका मार लागला आहे.

विशेष म्हणजे उपचारानंतर शुद्धीत आलेल्या या जोडप्याला डॉक्टरांनी उडी का मारलीत असा प्रश्न विचारल्यावर आम्ही उडी मारलीच नाही असे या दोघांनी सांगितले. एवढेच नाही तर तरुणीने आपण स्कूटीवरुन पडल्याचे डॉक्टरांना सांगितले. दरम्यान उडी मारण्याचे नेमके कारण या दोघांनी दिलेले नाही. यामुळे त्यांच्यावर अजून कुठलाही खटला दाखल करण्यात आलेला नाही. तसेच या दोघांच्या घरातल्यांनी अजून संपर्क केलेला नाही. यामुळे कुठलीही तक्रार नोंदवण्यात आलेली नाही.