थेट अंतराळात बांधा लग्नगाठ! अमेरिकेतील कंपनीने बनवले स्पेस कॅप्सूल

आजकाल डेस्टिनेशन वेडिंगचे प्रस्थ वाढले आहे. आपला लग्न सोहळा अविस्मरणीय असावा यासाठी जोडपी नवनवीन शक्कल लढवतात. कुणी विमानात लग्न करते तर कुणी खोल पाण्यात… आता चक्क अंतराळात जाऊन लग्नगाठ बांधता येणार आहे. फ्लोरिडामधील स्पेस पर्स्पेक्टिव्ह ही कंपनी अंतराळात लग्न करण्याची सुविधा देणार आहे.

स्पेस पर्स्पेक्टिव्ह ही कंपनी फुटबॉल स्टेडियमच्या आकाराचे एक स्पेस पॅप्सूल अवकाशात सोडणार आहे. हे कॅप्सूल जमिनीपासून एक लाख फूट उंचीवर तरंगणार आहे. या कॅप्सूलसाठी स्पेस बलूनचा वापर केला जाईल. सध्या ही कंपनी या ठिकाणी जाण्यासाठी एक लाख 25 हजार डॉलर्स म्हणजेच सुमारे एक कोटी रुपये तिकीट आकारत आहे. सहा तासांच्या या उड्डाणात आठ पाहुणे सहभागी होऊ शकतील. या बलूनमध्ये बाथरूम, बार आणि ऑनबोर्ड वायफाय सुविधा आहे.

हे कॅप्सूल पर्यावरणपूरक असणार आहे. कॅप्सूलवर जाताना आतील प्रवाशी सुमारे 450 मैल दूरपर्यंतचा परिसर पाहू शकणार आहेत.  यातून पृथ्वीचे विलोभनीय दृश्य पाहण्याचा आनंद प्रवाशी घेऊ शकतात.

पर्स्पेक्टिवचे नेतृत्व फ्लोरिडामधील टॅबर मॅक्कलन, जेन पॉयंटर या पती-पत्नीकडे आहे. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, अंतराळात लग्नगाठ बांधण्यासाठी 2024पर्यंत सर्व कॅप्सूलचे बुपिंग झाले असून आता 2025साठी बुकिंग सुरू आहे.

आपली प्रतिक्रिया द्या