
आर्थिक फसवणूकप्रकरणी अडचणीत आलेल्या राज पुंद्रा आणि शिल्पा शेट्टीविरोधात आर्थिक गुन्हे अन्वेषण विभागाने लुकआऊट नोटीस जारी केली आहे त्यामुळे त्यांना देश सोडून कुठेही जाण्यास निर्बंध आहेत. 2 ते 5 ऑक्टोबरदरम्यान कौटुंबिक सहलीनिमित्त फुकेतला जाण्याची परवानगी मिळावी यासाठी दोघांनी हायकोर्टात याचिका दाखल केली. या याचिकेवर आज बुधवारी मुख्य न्यायमूर्ती श्री चंद्रशेखर आणि न्यायमूर्ती गौतम अनखड यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली असता न्यायालयाने पुंद्रा आणि शिल्पा शेट्टी यांची सहलीला फुकेतला जाण्याची मागणी फेटाळून लावली.