राहुल गांधी, सिद्धारमय्या, डी.के. शिवकुमार यांना कोर्टाचे समन्स

काँग्रेसचे खासदार राहुल गांधी, कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारमय्या आणि उपमुख्यमंत्री डी.के. शिवकुमार यांच्याविरुद्ध कोर्टाने शुक्रवारी समन्स जारी केले आहे. भाजप सरकारवर 40 टक्के कमिशन घेत असल्याचा आरोप केल्यावरून या नेत्यांविरुद्ध कोर्टाने हे समन्स जारी केले आहे. या सर्व नेत्यांना पुढील महिन्यात 28 मार्चला विशेष खासदार-आमदार न्यायालयात उपस्थित राहण्यास सांगितले आहे. कर्नाटकातील विधानसभा निवडणुकी वेळी काँग्रेसने भाजपविरुद्ध एक खास मोहीम सुरू केली होती. याशिवाय पोस्टर लावले होते. यात माजी मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांचा फोटो होता. याविरोधात भाजपच्या लिगल युनिटमधील वकील विनोद कुमार यांनी काँग्रेस नेत्यांविरुद्ध तक्रार दाखल केली होती.